breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकात कॉंग्रेस आमदारांना एकत्र ठेवणारे शिवकुमार नाराज

बंगळूर – कर्नाटकात शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्याची तयारी सत्तारूढ आघाडी करत असतानाच कॉंग्रेसमधील बडे प्रस्थ असणारे नेते डी.के.शिवकुमार यांची नाराजी उघड झाली आहे. भाजपच्या गोटात कुठल्या कॉंग्रेस आमदाराने शिरकाव करू नये यासाठी त्यांना एकत्र ठेवणारे शिवकुमार उपमुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिल्याने नाराज असल्याचे समजते.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जी.परमेश्‍वर यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडली. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपद नाही तर प्रदेशाध्यक्षपदासाठी तरी शिवकुमार यांच्या नावाची लगेचच घोषणा होईल, असा त्यांच्या समर्थकांचा कयास होता. मात्र, कॉंग्रेसकडून तशी कुठली घोषणाही केली गेली नाही. त्यामुळे शिवकुमार यांच्या निवासस्थानाबाहेर आज जमा झालेल्या त्यांच्या समर्थकांमधील संतापाची भावना दडून राहिली नाही.

शिवकुमार यांनी स्वत: समर्थकांना शांत करताना निष्ठावान सदस्य म्हणूून पक्षाला धक्का देणारे कुठले कृत्य करणार नसल्याची ग्वाही दिली. अर्थात, पत्रकारांशी बोलताना शिवकुमार यांच्या मनातील भावना बाहेर पडल्या. प्रत्येक बाबीचा एक मुहूूर्त असतो आणि प्रत्येकाचीच वेळ येते. मी राजकारणात संन्यास घेण्यासाठी आलो नाही. मी फुटबॉल नव्हे तर बुद्धिबळ खेळेल. पक्षच माझ्याबाबत निर्णय घेईल. त्याची मी प्रतीक्षा करेन, असे त्यांनी म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button