breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकात आज विधानसभेचे मतदान

  • तिरंगी लढतीकडे साऱ्या देशाचे लक्ष

 
बंगळुरू – कर्नाटक विधानसभेसाठी उद्या दिन 12 रोजी मतदान होणार असून तेथे होणाऱ्या तिरंगी लढतीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. भाजप, कॉंग्रेस आणि जेडीएस या तीन पक्षांनी या निवडणुकीसाठी आपली सारी ताकद पणाला लावली असून गेले महिनाभर या राज्यात प्रचाराची मोठीच रणधुमाळी रंगली होती. या प्रचाराचा काल समारोप झाला आता प्रत्यक्ष मतदान उद्या होत असून त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयार केली आहे. एकूण 4 कोटी 98 लाख मतदार या निवडणुकीसाठी मतदान करण्यास पात्र आहेत. या राज्यातील विधानसभेच्या एकूण 223 जागा असून त्यासाठी एकूण 2600 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या मतदानासाठी एकूण 55 हजार 600 मतदान केंद्र उघडण्यात आली आहेत. निवडणुक यंत्रणेसाठी साडे तीन लाख कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीसाठी मिशन 150 जाहीर केले होते. तथापी काल पत्रकारांशी बोलताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपला पक्ष किमान 130 जागा जिंकेल असे म्हटले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनीही कॉंग्रेस पक्षच या निवडणुकीत बहुमत मिळवेल असा दावा केला आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या सभांनी या राज्यातील वातावरण ढवळून निघाले. अनेक वाहिन्यांनी आपले मतदानपुर्व जनमत चाचण्यांचे निकाल जाहीर केले.त्यानुसार राज्यात त्रिशंकु विधानसभा अस्तित्वात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे पण कॉंग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल असाच बहुतांशी चाचण्यांचा निष्कर्ष आहे. तथापि कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळणार नसल्याने जेडीएस किंगमेकर बनेल असेही अनेकांचे म्हणणे आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकातील जनतेचा कौल उद्या मतदान यंत्रात बंद होईल. उद्या अनेक वाहिन्यांनी मतदानानंतरच्या एक्‍झिट पोलचीही व्यवस्था केली असल्याने या एक्‍झिट पोल विषयीही उत्सुकता आहे. या राज्यात 15 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button