breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकच्या विकासात भाजप बाधा येऊ देणार नाही – मोदी

  • भाजपच्या विजयाचे सत्र कायम राहील – शहा 
    भाजपच्या विजयाचे सत्र कायम राहील. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या सर्व निवडणुका पक्ष जिंकेल, असा विश्‍वास यावेळी बोलताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. प्रचंड प्रमाणात धनशक्ती आणि मनगटशक्तीचा वापर करूनही कर्नाटकच्या जनतेने कॉंग्रेसला नाकारले, असे ते म्हणाले.

नवी दिल्ली – कर्नाटकचा निकाल म्हणजे भाजपचा अभूतपूर्व विजय आहे. त्या राज्याच्या विकासात भाजप बाधा येऊ देणार नाही, अशी ग्वाही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

कर्नाटकमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरल्यानंतर पक्षाच्या येथील मुख्यालयात मोदींनी नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. गुजरात, महाराष्ट्र आणि आसामसारख्या हिंदी भाषिक नसणाऱ्या राज्यांत भाजपने सरकारे स्थापन केली. तरीही भाजप उत्तर भारतातील पक्ष असल्याचा खोटा प्रचार केला जातो. अशाप्रकारची चुकीची मानसिकता जोपासणाऱ्यांना कर्नाटकने चोख उत्तर दिले आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी नामोल्लेख टाळून कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले.

अनेक दशके देशावर राज्य करणाऱ्या पक्षाने उतर भारत विरूद्ध दक्षिण भारत असा मुकाबला लावून आणि केंद्र व राज्यांत तणाव पसरवून राज्यघटनेचे आणि देशाच्या संघराज्यीय रचनेचे नुकसान केले. निवडणुका होत राहतात. मात्र, देशाच्या विविध संस्थांना नुकसान पोहचवण्याचे प्रयत्न हा चिंतेचा विषय आहे, असे त्यांनी म्हटले.

यावेळी उपस्थित असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे मोदींनी तोंडभरून कौतुक केले. त्यांच्या उत्कृष्ट रणनीतीमुळे पक्षाला एकपाठोपाठ एक यश मिळत आहे. त्यांच्या कठोर मेहनतीतूून पक्षाचे कार्यकर्ते बरेच काही शिकू शकतात, असे त्यांनी सूचित केले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button