breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

कर्नाटकचे राज्यपाल आरएससएसचे कार्यकर्ते – अशोक चव्हाण

मुंबई : काँग्रेसतर्फे आज संपूर्ण देशामध्ये ‘लोकशाही वाचवा दिवस” – एक दिवसीय सांकेतिक धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी, भाजपने लोकशाहीची पाळेमुळे उपटून काढलेली आहे. भाजपने भारताची लोकशाही धोक्यात आणून ठेवलेली आहे. राज्यपाल देश चालवत आहेत असे चित्र निर्माण झालेले आहे. गोवा, मणिपूर, मेघालय आणि आता कर्नाटकात राज्यपालांनी भाजपच्या दबावाखाली निर्णय दिलेले आहेत.

राजभवन हे सत्ताधार्यांचा अड्डा बनलेला आहे. सर्व सूत्र राजभवन वरुन हलत आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या जोडगोळीने दबावतंत्र वापरून राज्यपालांना निर्णय घ्यायला भाग पाडलेले आहे. कर्नाटकचे राज्यपाल हे आरएससएसचे कार्यकर्ते आहेत. नरेंद्र मोदिच्या गुजरात मंत्रिमंडळात ते होते, त्यामुळेच बहुमत नसताना हि भाजपच्या बाजूने निकाल दिला. निवडणूक झाली की आमदार पळवायचे, पैसे वाटायचे, फोडाफोडीचे राजकारण करायचे, पोलिसांचा दबाव आणायचा, असले घाणेरडे राजकारण भाजप करत आहेत. काँग्रेसने असे कधीही केलेले नाही, आम्ही नेहमी लोकांचा कौल ऐकला, लोकांच्या निर्णयाचे स्वागत केले, काँग्रेस नेहमी लोकांच्या बाजूने उभे राहिली. काँग्रेसने लोकशाहीचा नेहमी आदर केलेला आहे. कर्नाटकात उद्या काँग्रेस बहुमत सिद्ध करेल असा मला संपूर्ण विश्वास आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button