breaking-newsपिंपरी / चिंचवड

कर्ज फेडण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या एकाला मोरवाडीतून अटक

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – कर्ज फेडण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या एका इसमाला गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने बुधवारी (दि.१९) मोरवाडी लालटोपीनगर येथून अटक करण्यात आली. पोलीसांनी आरोपीकडून एकूण तीन दुचाक्या जप्त केल्या असून निगडी, चाकण आणि पिंपरी पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

संतोष राजाराम शिंदे (वय ३७, रा. नाना कोकरे यांची चाळ, खोली क३.४, अंगनवाडी रोड, मोरेवस्ती, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायबर गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक निलेश बोडखे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, एका तरुणाकडे (एमएच/१४/एएफ/०१०३) या क्रमांकाची चोरीची दुचाकी असून तो चिखली येथून मोरवाडीकडे निघाला आहे. ही माहिती त्यांनी गुन्हे शाखा युनिट २ च्या पोलीसांना दिली. यावर पोलीसांनी मोरवाडी कोर्ट येथे सापळा रचला. काही वेळातच पोलीसांना आरोपी संतोष हा दुचाकी घेऊन येताना दिसला. पोलीसांनी त्याला थांबण्यास सांगितले मात्र तो दुचाकी घेऊन पळून लागला. पोलीसांनी पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्याजवळील दुचाकी ही चोरीचे असल्याचे सांगितले. तसेच त्याने पिंपरी, निगडी आणि चाकण येथे देखील दुचाकी चोरी करुन चिखली येथे ठेवल्याची माहिती पोलीसांना दिली. पोलीसांनी त्या दुचाक्या जप्त करुन आरोपी संतोष शिंदे याला अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता कर्ज फेडण्यासाठी त्याने दुचाक्या चोरल्याचे पोलीसांना सांगितले.

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, निलेश बोडखे आणि पोलीस कर्मचारी राहुल खारगे, किरण अरुटे, दत्ता बनसुडे, चेतन मुंढे, संदिप ठाकरे, अतुल लोखंडे, भासकर भारती, नितेश बिच्चेवार यांच्या पथकाने केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button