breaking-newsमनोरंजन

करिना आणि मिराचा झाला आमना-सामना

भारतीय उद्योगपती मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानीच्या शाही लग्नसोहळ्याला राजकीय नेत्यांसह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी शिरकत केली होती. मुंबई झालेल्या कार्यक्रमात अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, ऐश्‍वर्या राय-बच्चन, प्रियांका चोपडा, सलमान खान, शाहरुख खान आदी स्टार कलाकारांनीही हजेरी लावली होती.

यावेळी करिना कपूर-खान आपला पती सैफ अली खान आणि बहिण करिश्‍मा कपूरसोबत आली होती. याप्रसंगी करिनाचा एक्‍स बॉयफ्रेंड शाहिद कपूरही आपल्या पत्नी मीरा राजपूतसह आला होता. दरम्यान, मुकेश अंबानीच्या “अँटीला’ बंगल्यात या दोन्ही जोडींचा अचानक एकमेकांशी सामना झाला.

करिना आणि शाहिद यांचा ब्रेकअप झाल्यानंतरही दोघांचे संबंध मैत्रीपूर्ण असल्याचे सर्वांनाच माहित आहे. पण, जेव्हा करिना आणि मीरा यांचा एकमेकांशी थेट संबंध आला तेव्हा त्यांनी कोणताही दुरावा न दाखविता एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तसेच दोघिंनी गळाभेटही घेतली. यावेळी शाहिद आणि सैफनेही दिलखुलासपणे संवाद साधला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button