breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

करसंकलनच्या कर्मचा-यांवर नव्हे तर अधिका-यांवर कारवाई करा

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे आयुक्तांना पत्र 

उद्दिष्ट पुर्ती वसुली न केल्याने 88 कर्मचा-यांवर दंडात्मक कारवाई 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या करसंकलन विभागातील 88 कर्मचा-यांनी शास्तीकर व मिळकत वसुली निर्धारीत उद्दिष्ट वसुली न केल्याने 88 कर्मचा-यांना नोटीस बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, ही कारवाई कर्मचा-यावरच न करता त्यांच्यावर नियंत्रण ठेवणा-या संबंधित अधिका-यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की,  महापालिकेच्या करसंकलन विभागातील वर्ग तीनच्या कर्मचा-यांना शास्तीकर व मिळकत वसुली निर्धारीत उद्दीष्ट देण्यात आले होते. वसूली न केल्यामुळे नोटीसा बजावून खुलासा मागविण्यात आला होता. त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा नसल्याने त्या कर्मचा-यांस वसूलीचे कामकाजामध्ये निष्काळजीपणा व कर्तव्यात हयगय केल्याने एक वेतनवाढ स्थगिती आणि २५० रुपये दंडात्मक कारवाई करुन  त्यांची नोंद संबंधित कर्मचा-यांच्या सेवा नोंद पुस्तकात घेण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.

शास्तीकराचा प्रश्न राज्य सरकार पातळीवर प्रलंबित आहे. चार वर्षापासून राज्य सरकार शास्तीकर माफ करण्याचे आवश्वासने देत आहे. त्या अनुषांने स्थानिक पदाधिकारी, आमदार व खासदार शास्तीकर भरु नका, असे नागरीकांना वेळोवेळी आवाहन करीत आहेत. त्यामुळे शहरातील नागरीक शास्तीकर भरत नाहीत. गेली चार वर्षापासून शास्तीकरासह मिळकत कर भरणे अनिवार्य केले होते. त्याच्यापूर्वी फक्त मिळकत कर भरुन घेतला जात आहे. यामुळे नागरीक शास्तीकर माफ होईल या आशेने शास्तीकर भरत नाहीत. शास्तीकर भरला तरच  मिळकत कर भरुन घेतला जात असे शास्तीकर वगळता फक्त मिळकत कर भरुन घेतला जात नव्हता. त्यामुळे नागरीकांनी मिळकत करही भरलेला नाही.

यामध्ये दंडात्मक कारवाई केलेल्या कर्मचा-यांमध्ये काही कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र आहेत. तर काही सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या सेवानोंद पुस्तकात दंडाची नोंद केल्यामुळे त्यांच्या पदोन्नती व पेन्शनवर परीणाम होऊ शकतो. तसेच दंडात्मक वसुलीची कारवाई फक्त वर्ग तीनच्याच कर्मचा-यांवर करण्यात आली आहे. यासाठी फक्त वर्ग तीनचेच कर्मचारी जबाबदार आहेत काय? यांच्यावर नियत्रंण ठेवणारे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, संबंधित प्रशासन अधिकारी यानांही जबाबदार धरण्यात यावे, त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. 

 तसेच शास्तीकर व मिळकत कर वसूली करण्यांमध्ये वर्ग तीनच्या कर्मचा-यांची चूक झालेली  नाही. त्यांनी नेमून दिलेली कामे केलेली आहेत. ज्या कर्मचा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे त्यांची नोंद सेवानोंद पुस्तकात घेण्यात येऊ नये. व वेतनवाढ स्थगितीची कारवाई करण्यात येऊ नये.असेही त्यांनी म्हटले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button