breaking-newsमनोरंजन

करण पटेल लवकरच होणार बाबा

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ये हैं मोहब्बते’ मधील रमण भल्ला अर्थात करण पटेल याने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. करण आणि त्याची पत्नी अंकिता भार्गव या दोघांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.

ही आनंदाची बातमी अंकिताने करणला एका खास अंदाजात दिली. तसेच करण आणि अंकिताने आपला नवा फोटोही शेअर केला आहे.  आपला आनंद चाहत्यांबरोबर शेअर करण्यासाठी करणने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली. ‘अंकिता आता केवळ माझी पत्नी नाही तर ती कोणाची तरी आई होणार आहे. अंकिता आणि मला सख्खे भाऊ-बहिण नाहीत. त्यामुळे आम्हाला दोन बाळं हवी आहेत. आमच्या बाळाला बहीण-भावाचं प्रेम मिळावं ही आमची इच्छा आहे’, असे करणने सांगितले. तसेच करणला एका मुलीचा पिता व्हायची इच्छा असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button