breaking-newsमनोरंजन

कतरिनासोबत सोनाक्षी सिन्हाचे वर्कआउट

सोनाक्षी सिन्हा ही बॉलीवुडमधील त्या अभिनेत्रीपैकी एक आहे, ज्या सिल्वर स्क्रिनसोबतच रियल लाइफमध्येही “दबंग’ स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडियावरही सतत ऍक्‍टिव असते. तिने नुकताच एक व्हिडियो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यात ती मदतीसाठी मोठमोठयाने ओरडत आहे. यात तिच्यासोबत कतरिना कैफही दिसते. मात्र, ती सोनाक्षीसारखी ओरडताना नव्हे तर हसताना दिसत आहे.

सोनाक्षीने वर्कआउट करत असल्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात ती कतरिनासोबत व्यायाम करताना दिसते. त्यांच्यासोबत त्यांच्या ट्रेनरही आहे. हा व्हिडिओ कतरिना आणि ट्रेनरला टॅग करत सोनाक्षीने लिहिले की, वैधानिक चेतावनी: यांच्यासोबत वर्कआउट करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे (संभवता याचा उलटाही परिणाम दिसून येउ शकतो).

कतरिना आणि सोनाक्षी या दोघी सलमान खानच्या “दबंग’ टूरच्या निमित्ताने विविध देशात परफॉर्म करत आहेत. तसेच त्यांच्यासोबत जॅकलीन फर्नांडिसही आहे. या व्यस्त शडयूलमध्येही या दोघी आपल्या फिटनेसची काळजी घेताना दिसून येत आहे. दरम्यान, काही महिन्यांपर्वी कतरिनाचा आलिया भटसोबतच्या वर्कआउटचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button