breaking-newsमनोरंजन

कतरिनामुळे हुकली जॅकलीनची ‘भारत’मध्ये झळकण्याची संधी

चित्रिकरणाला अवघे १० दिवस बाकी असताना प्रियांकानं ‘भारत’ चित्रपटाला सोडचिठ्ठी दिली. ऐनवेळी प्रियांकाने या बिग बजेट चित्रपटाला नकार दिल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. मात्र प्रियांकाच्या वाट्याला हॉलिवूडपट आल्यामुळे तिने ‘भारत’ला नकार दिल्याचं सांगण्यात आलं आहे. प्रियांकाने चित्रपटाला नकार दिल्यानंतर या चित्रपटामध्ये कतरिनाची वर्णी लागली. मात्र जॅकलीनला या चित्रपटामध्ये झळकण्याची प्रचंड इच्छा होती, असं समोर आलं आहे.

प्रियांकाने नकार दिल्यामुळे या चित्रपटात कोणती अभिनेत्री झळकणार याविषयी जोरदार चर्चा रंगली होती. या भूमिकेसाठी अभिनेत्री कतरिना कैफ आणि जॅकलिन फर्नांडिस या दोघींच्या नावाचा विचार सुरु होता. मात्र अखेर कतरिनाची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली.

सूत्रांच्या माहितीनुसार, ‘रेस ३’ चित्रपटामध्ये सलमानबरोबर जॅकलीनने स्क्रिन शेअर केली होती. मात्र हा चित्रपट म्हणावा तेवढा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला नाही. त्यामुळे सलमानने ‘भारत’साठी जॅकलीनच्या नावाला म्हणावं तसं प्राधान्य दिलं नाही. विशेष म्हणजे कतरिना ही कायमच सलमानची पहिली पसंती असते. त्यामुळेच सलमानच्या मर्जीने जॅकलीन ऐवजी कतरिनाची या चित्रपटासाठी निवड करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, ज्यावेळी नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु झाला तेव्हा सलमानने प्रथम कतरिनाच्या नावाला पसंती दिली होती. मात्र या चित्रपटामध्ये झळकण्याची जॅकलीनची प्रचंड इच्छा होती. मात्र अखेर कतरिनाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने जॅकलीनचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button