breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कणदूर येथील विद्युत महावितरणच्या उपकेंद्राचे बांधकाम अनधिकृत

  • या कामांची सखोल चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी

सागांव (वार्ताहर) – कणदूर ग्रामपंचायत मालकीच्या जागेत विद्युत महावितरण कंपनीने उभारलेल्या वीज उपकेंद्राचे बांधकाम अनधिकृत असून शासकीय कोणतीही परवानगी न घेता हे बांधकाम झाले आहे. या कामांची सखोल चौकशी करावी व ग्रामपंचायतीस विद्युत वीज वितरण कंपनीने मोबदला द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कणदूर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

 

कणदूर ग्रामपंचायत मालकीच्या जागेमध्ये वीज वितरण कंपनीने कोणतीही रितसर परवानगी न घेता बांधकाम केले आहे. या बदल्यात ग्रामपंचायतीस कसलाही मोबदला मिळालेला नाही. उलट या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना दमदाटी व त्रास देण्याचे काम चालू आहे. ग्रामपंचायत मालकीच्या जागेत वीज उपकेंद्र उभारले आहे. त्यांचा बांधकाम परवाना घेतलेला नाही. यांच्यासह संबंधित खात्याचे आवश्यक परवाने घेतलेले नाहीत, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व वीज मंडळाने ग्रामपंचायतीस जागेचा मोबदला द्यावा, अन्यथा भाडेकरार करावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने भेटून जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांच्याकडे केली.

 

यावेळी उपसरपंच आनंदराव पाटील, संपत पाटील, माजी सरपंच बाबुराव पाटील, दिलीप पाटील, माजी उपसरपंच संजय पाटील, आनंदा पाटील, रामदास गुरव, विष्णू पाटील, गणेश रसाळ, योगेश पाटील, वसंत गोवकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button