breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कच्च्या तेलाच्या दरात घसरण…पेट्रोलचे दर ८० रुपयांवर!

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरत आहेत. भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत मजबूत होत आहे. तरीही इंधनाच्या दरांत सातत्याने वाढ होत आहे. मुंबई, नवी दिल्लीतील पेट्रोलच्या किमती तीन वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. मुंबई आणि नवी दिल्लीत एक लिटर पेट्रोलसाठी अनुक्रमे ८० रुपये आणि ७०.३८ रुपये मोजण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. दुसरीकडे कोलकाता आणि चेन्नई या महानगरांमध्येही पेट्रोलच्या किमती उच्चांकी पातळीवर आहेत. पेट्रोलियम उत्पादनांचा समावेश जीएसटीमध्ये समावेश करण्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले.

यासंदर्भात पेट्रोलियम मंत्रालयाने तातडीची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार जगभर कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असून, गेल्या तीन महिन्यांत १८ टक्के वाढ झाली आहे. १६ जून रोजी केंद्र सरकारने ‘डायनॅमिक फ्युएल प्रायसिंग’ पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इंधनाचे दर दररोज बदलत गेले. हा निर्णय अंमलात आल्यानंतर १ जुलैपर्यंत नवी दिल्लीत पेट्रोलच्या प्रति लिटर दरात ७.२९ रुपयांनी वाढ झाली. सध्या दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी ७०.३८ रुपये मोजावे लागत आहेत. यापूर्वी ऑगस्ट २०१४मध्ये दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर ७०.३३ रुपयांवर गेला होता.

… म्हणून मुंबईत पेट्रोल महाग

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मते प्रत्येक राज्यात पेट्रोलवरील करांचे प्रमाण वेगळे आहे. त्यातच पुन्हा मुंबईमध्ये इंधनांवरील करांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने येथील पेट्रोलचे दर अन्य राज्यांपेक्षा अधिक आहेत. गेल्या तीन महिन्यात कच्च्या तेलाच्या किमतीत १८ टक्के वाढ झाली आहे. मात्र, येत्या काही दिवसांत पेट्रोलच्या दरात घट होण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलदरात १३.८ टक्के घट

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून आहेत. विश्लेषकांच्या मते गेल्या सहा महिन्यांत कच्च्या तेलाच्या दरात १३.८ टक्के घट झाली असून, रुपयाही २.९४ टक्क्यांनी मजबूत झाला आहे. त्यानंतरही इंडियन बास्केट क्रूडच्या किमतीत सातत्याने वाढ नोंदवण्यात येत आहे. मात्र, ही वाढ नेमकी कशामुळे होत आहे, हे तज्ज्ञांच्या लक्षात येत नसल्याचे चित्र आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button