breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कचरा विलगीकरण, खतनिर्मितीसाठी ई क्षेत्रीय कार्यालयात नि:शुल्क मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके

पिंपरी – घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ मधील तरतूदीनुसार नागरिक व व्यावसायिक यांनी घर, परिसर, व्यवसाय आदी ठिकाणी उत्पन्न होणारा ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा गोळा करणे कायदेशीर बंधनकारक आहे. शहरातील सर्व  वैयक्तीक कुटूंबे, गृहनिर्माण संस्था, निवासी संकुले, बाजार संकुले, हॉटेल व उपहारगृहे, दुकाने, कार्यालये यामध्ये निर्माण होणा-या घनकच-याचे विलगीकरण व खतनिर्मिती कशी करायची, याचे निशुल्क प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात येत आहे. तरी, याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

 

जे घर, परिसर,  व्यवसाय इत्यादी ठिकाणी दर दिवशी १०० किलो अथवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण होतो, किंवा जे घर, परिसर, व्यवसाय इत्यादी जागेचे क्षेत्रफळ ५ हजार चौ. स्क्वे. मी. व त्यापेक्षा जास्त आहे. अशा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. या कार्यक्षेत्रातील मोठया प्रमाणात उत्पन्न होणा-या ओल्या कच-यावर कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करणे आवश्यक असुन उरलेला सुका कचरा महापालिकेस दयावा, असे कळविण्यात आले आहे. अन्यथा महापालिकेकडुन दंडांत्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

ई क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आरोग्याधिकारी प्रभाकर तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमनशिल्प या सोसायटीमध्ये कचरा विलगीकरण व  कच-यापासुन खतनिर्मिती प्रत्यक्षरित्या साकार केली आहेत. तरी, सर्व नागरिक, व्यापारी, गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था, बचतगट यांना कचरा विलगीकरण व  कच-यापासून खतनिर्मितीचे प्रात्यक्षिक  व मार्गदर्शन हवे असल्यास (मो- ९९२२५०१८८५) अवश्य संपर्क साधा, असे आवाहन तावरे यांनी केले आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button