breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

कचरा फेकणाऱ्या अरहानची विराट-अनुष्काला नोटीस

मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणी त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी सोशल मीडियावर रस्त्यावर कचरा फेकण्यासंबंधीतचा पोस्ट केलेला व्हिडिओ चांगलाच महागात पडला आहे. याप्रकरणी मला सोशल मीडियावर बदनाम करण्यात आले, असे म्हणत अरहान सिंहने विराट कोहली आणि अनुष्का शर्माला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

काही दिवसांपूर्वी रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या अरहान सिंह नावाच्या तरुणावर अनुष्का शर्मा भररस्त्यात ओरडली होती. त्यानंतर विराटने रस्त्यात घडलेल्या या सर्व प्रकाराचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
अरहान सिंहने 23 जूनला विराट आणि अनुष्काला ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मला आता या प्रकरणावर काहीच बोलायचे नाही, मी त्यांच्या उत्तराची वाट बघतोय, असे या तरूणाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

विराटने ट्‌विटरवर शेअर केलेला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओला 1.25 लाखांहून अधिक लाईक्‍स, तर आठ हजारांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्‌वीट केला. सोशल मीडियातून मोठी प्रतिक्रिया उमटल्यानंतर अरहान सिंहने एक पोस्ट लिहित आपली बाजू स्पष्ट केली होती. तर दुसरीकडे, विराट आणि अनुष्काने प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्या मुलाचा वापर केला, असे म्हणत अरहानच्या आईनेही विराट आणि अनुष्का शर्मावर टीका केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button