breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कचरावेचक कामगारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या वाटप

– सामाजिक बांधिलकी जोपासत प्रभू मीडिया ग्रुपचा स्तुत्य उपक्रम
पिंपरी ( महा ई न्यूज ) – प्रभू मीडिया ग्रुपच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील कचरा वेचक कामगारांच्या दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
पिंपरीच्या मेघाजी लोंखडे कामगार भवनातील श्रमिक पत्रकार संघ कार्यालयात आज (मंगळवारी) सायंकाळी चार वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयएमचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अकील मुजावर, फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते, वंचित बहूजन आघाडीचे गुलाब पानपाटील, कचरावेचक संघटनेच्या प्रवक्त्या सोनाली कुंजीर, रयत विद्यार्थी विचार मंच अध्यक्ष धम्मराज साळवे, सीए अरविंद भोसले, पत्रकार विजय जगदाळे, कष्टकरी पंचायतीचे प्रल्हाद कांबळे, डाॅ बाबासाहेब आंबेडकर संघटनेचे अध्यक्ष सतीश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
महापालिकेच्या घंटागाडीवर कचरा गोळा करणा-या कामगारांच्या दहावी उत्तीर्ण 10 गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि गुलाब पुष्प देवून त्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी आई-वडीलाच्या कष्टांचे चीज करा,  जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर प्रशासकीय क्षेत्रात अधिकारी व्हा, असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप लोंखडे यांनी केले. सुत्रसंचालन विकास शिंदे यांनी केले. तर विजय जगदाळे यांनी आभार मानले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button