breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कंपन्यांनी विकास कामांना हातभार लावावा – पक्षनेते एकनाथ पवार

पिंपरी- शहरातील कंपन्यांनी विकास कामामध्ये हातभार लावून लोकांचा जीवन मानाचा स्तर वाढवावा, असे आवाहन सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि सीएसआर सेलने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भारत फोर्ज कंपनीच्या उपाध्यक्षा लीना देशपांडे, स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, डॉ. प्रवीण अष्टीकर, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण तसेच विविध कंपन्या तसेच सामाजिक संस्थांचे 150 पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”सीएसआरच्या माध्यमातून स्थानिक कंपन्यांनी आपला सहभाग वाढवावा. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका करीत असलेल्या विकासाच्या कामाला वेग आणून त्याचे मूल्य वर्धित करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजवावी. खासगी संस्थांनी, कंपन्यांनी आपल्याकडे उपलब्ध असणारे तंत्रज्ञान, मानवी शक्तीचा वापर समाजाच्या विकासासाठी करावा” असे आवाहनही त्यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button