breaking-newsमहाराष्ट्र

औषध खरेदी करताना सावधानता बाळगा

  • ग्रामीण भागात  औषधांची साठवणूक नीट न करण्याचे प्रकार

जिल्ह्यात सातशे मेडिकल्सची तपासणी 
एफडीएची कारवाई: 98 दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली
पुणे, दि. 14 – शहरी भागात अनेकदा नागरिक सुशिक्षित असल्याने तसेच शहरी भागात अनेक आरोग्यविषयक काम करणाऱ्या संघटना काम करत असल्याने मेडिकल्सच्याबाबतीत गंभीर चुका होण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र, ग्रामीण भागात गेल्या काही काळात घडलेल्या घटना पाहता या मेडिकलमधून औषध खरेदी करण्याआधी त्यांची सत्यता तपासणे गरजेचे झाले आहे.

काही औषधे अशी असतात. ज्यांना काही विशिष्ट तापमानात ठेवणे गरजेचे असते. ग्रामीण भागात काही ठिकाणी वीज वाचविण्यासाठी किंवा वीज पुरवठा खंडित होत असल्याने औषधे एका विशिष्ट तापमानात ठेवली जात नाही. यामध्ये इंन्शुलिन, ऍन्टीबायोटिक्‍स औषधांचे प्रमाण असते. त्यामुळे अशा मेडिकल्सवर आम्ही कठोर कारवाई करतो.
– सुरेश पाटील, सहाय्यक आयुक्‍त, अन्न व औषध विभाग, पुणे

गेल्या वर्षभरात अन्न व औषध प्रशासनातील औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत काही गंभीर घटना दिसून आल्या आहेत. ग्रामीण भागात झालेल्या या कारवाईत मेडिकलमध्ये प्रशिक्षित व्यक्‍ती नसणे, औषधांची साठवणुकीसाठी पुरेशी यंत्रणा नसणे, चुकीचे लेबल लावून औषधे विकणे, विनापरवाना गुंगी येणारे औषधाची विक्री करणे आदी गंभीर प्रकार समोर आले आहेत. त्यामुळेच औषध खरेदी करताना मोठी सावधानता बाळगण्याची गरज आहे.
याबाबत बोलताना पुणे विभागाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्‍त सुरेश पाटील म्हणाले, गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईमध्ये आम्ही ग्रामीण भागातील 777 मेडिकल्सची तपासणी केली. त्यामध्ये 98 जणांना कारणे दाखवा नोटीसा दिल्या. तसेच 86 जणांचा परवाना काही काळापुरता रद्द केला तर 15 जणांचा परवाना कायमस्वरुपी काढून घेतला आहे. ही कारवाई जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, बारामती, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे, इंदापूर, दौंड, सासवड व शिरुर या ठिकाणी झाली आहे. या कारवाई दरम्यान दोन जणांवर खटलेही भरले आहेत. तर तिसऱ्यावर खटला भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. जुन्नरमध्ये आम्हाला काही मेडिकल चालक विनापरवाना गुंगीचे औषध विकताना आढळले. एके ठिकाणी विनापरवाना मेडिकल चालविले जात होते. बारामती येथे झालेल्या गुन्ह्यामध्ये डमी प्रॉडक्‍ट बनवून त्यावर लोकल लेबल लावून औषधे विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button