breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

ओला टॅक्सीच्या विश्वासार्हतेला तडा : दिवसा ओला टॅक्सी चालक आणि रात्री घरफोडय़ा

जयंत धुळप

अलिबाग – रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पेण येथे बुधवारी रात्री सापळा रचून,दिवसा ऑला टॅक्सी चालविणे आणि रात्री बँका व पतपेढय़ांमध्ये घरफोडय़ा करुन ऐवज लंपास करणाऱ्या ओला ट्रक्सी चालक भुषण सिताराम पवार आणि विनोद देवराम देवकर या दोघांना ओला टॅक्सीसह रंगेहाथ अटक करण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास यश आले आहे. या दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ओला टॅक्सीतून येवून घरफोडय़ा करण्याच्या या गुन्ह्यामुळे ओला ट्रक्सी बाबतच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे.

पेण न्यायालयात चाेरी करिता आले असताना रंगेहाथ अटक

एक ओला टॅक्सी चालक व त्याचे दोन साथीदार यांनी बॅन्का व पतसंस्थांमध्ये अनेक चो:या केल्या असून बुधवारी रात्री ते पेण न्यायालयात चोरी करण्याकरिता ओला टॅक्सी क्र .एम.एच.47/सी-9968 मधून येणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक पारस्कर यांना प्राप्त झाली होती.  पोलीस अधीक्षक पारस्कर यांनी दिलेल्या आदेशान्वये, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि जे.ए.शेख, सपोनि सचिन सस्ते, सपोनी दिलीप पवार, पोउपनी अमोल वळसंग यांच्या पथकाने सापळा लाऊन ओला ट्रक्सी चालक भुषण सिताराम पवार आणि विनोद देवराम देवकर या दोघाना रंगेहात रात्नीच्या वेळी पेण येथे पकडले. त्यांच्या ओला टॅक्सीची तपासणी केली असता त्यात दोन लोखंडी कटावण्या, हॅक्सॉबेल्ड, दोन स्क्रू डायव्हर आदी घरफोडीची हत्यारे मिळाली.

11 दाखल गुन्ह्यांची उकल

दोघांकडे कसून तपास केला असता त्यांनी वडखळ, पोलादपूर येथील दाखल गुन्हयाची कबुली देऊन अलिबाग नागाव येथील दोन बंगल्यांची कुलपे तोडून त्याचप्रमाणो रसायनी व रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील मायक्र ो फायनान्सचे ऑफिस, खेड मधील एच.पी.गॅस चे ऑफिस, टीव्ही शोरूम, दापोली येथील टीव्ही शोरूम, कल्याण येथील पतपेढीच्या तसेच आचरा सिंधूदुर्ग येथील तिन बंगल्यांचे कुलूप तोडून चोरी केल्याची व इतर ठिकाणी चोरी व घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. एकूण 11 दाखल गुन्ह्यांची उकल या दोघाना अटक केल्याने झाली आहे.

नामचिन आराेपी, काेकणातील अन्य गुन्ह्याची देखील उकल होण्याची शक्यता 

ओला ट्रक्सी चालक भुषण सिताराम पवार मुळचा रत्नागीरी जिल्ह्यातील दापोलीचा आहे तर विनोद देवराम देवकर हा मुळचा यवतमाळ जिल्ह्यातील असून सन 2००9 पासून त्यांच्यावर मुंबईतील घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. विनोद देवकर यांची बालगुन्हेगार म्हणून देखील मुंबईतील पोलीस ठाण्यात नोंद आहे. त्यांनी केलेल्या घपफोडय़ांमध्ये वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पतपेढीचे कुलूप तोडून रोख 2 लाख 75 हजार रुपये ठेवलेली तिजोरी, पतपेढीतील सी.सी.टी.व्ही. कॅमेरेचा डी.व्ही.आर. व इतर सामान लंपास केल्याचा गुन्हा वडखळ पोलीस ठाण्यात 3 जुलै 2०18 रोजी दाखल आहे. पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पत पेढीच्या दरवाजाचे कुलूप तोडून तिजोरीतील रक्कम 1 लाख 46 हजार लंपास केल्याचा गुन्हा पोलादपूर पोलीस ठाण्यात दाखल आहे. तर अलिबाग पोलीस ठाणोच्या हद्दीत नागाव येथील दोन बंगल्यांचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. दोघानांही प्रथम वडखळ पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून रायगड, रत्नागीरी व सिंधूदूर्ग जिल्ह्यातील गुन्ह्याची देखील उकल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button