breaking-newsराष्ट्रिय

ओडिशामध्ये सहा नक्षलवादी ठार

बालांगीर: ओडिशामध्ये रविवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी चकमक झाली. या चकमकीत सहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

कांधमाल येथे स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली असता त्यात चार नक्षलवादी ठार झाले. या नक्षलवाद्यांकडून एके-४७, बंदुका आणि इतर शस्त्रास्त्रांचा साठा मोठ्याप्रमाणावर जप्त करण्यात आला आहे. हे नक्षलवादी मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते, असं सांगण्यात येतं. रविवारी बालांगीर जिल्ह्यात सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांच्या विरोधात मोहीम हाती घेतली होती. यावेळी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button