breaking-newsआंतरराष्टीय

ऐतिहासिक! मृत महिलेने दान केलेल्या गर्भाशयाच्या प्रत्यारोपणातून पहिल्या बाळाचा जन्म

मृत महिलेने दान केलेल्या गर्भाशयाच्या प्रत्यारोपणातून एका महिलेने सुदृढ बाळाला जन्म दिला आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये ब्राझील साओ पावलो येथे ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मृत महिलेने दान केलेल्या गर्भाशयाच्या प्रत्यारोपणातून मुलीचा जन्म होण्याची वैद्यकीय इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. गर्भाशय समस्येमुळे कधीही आई बनू न शकणाऱ्या हजारो महिलांसाठी ही प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया म्हणजे एक आशेचा किरण आहे असे लानसेटमध्ये प्रकाशित अहवालात म्हटले आहे.

ब्राझीलमध्ये ज्या महिलेच्या शरीरात हे गर्भाशय प्रत्यारोपित करण्यात आले होते तिने डिसेंबर २०१७ मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. २०१४ साली स्वीडनमध्ये पहिल्यांदा गर्भाशय प्रत्यारोपणातून अर्भकाचा जन्म झाला होता. त्यासाठी जिवंत महिलेने आपले गर्भाशय दान केले होते. १० ते १५ टक्के जोडप्यांना वंधयत्वाचा सामना करावा लागतो असे डॉक्टरांनी सांगितले ५०० पैकी एका महिलेला गर्भाशयाच्या समस्येचा सामना करावा लागतो.

ब्राझीमध्ये ज्या ३२ वर्षीय महिलेवर गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. तिचा एका दुर्मिळ आजारामुळे गर्भाशयाशिवाय जन्म झाला होता. स्ट्रोकमुळे निधन झालेल्या एका ४५ वर्षीय महिलेने तिचे गर्भाशय डोनेट केले होते. ब्राझीलच्या रुग्णालयात १० तासापेक्षा जास्त वेळ गर्भाशय प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया चालली होती. प्रत्यारोपित होणारा नवीन अवयव शरीराने नाकारु नये यासाठी महिलेला पाच वेगवेगळया प्रकारची औषधे देण्यात आली होती. पाच महिन्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये नवीन गर्भाशय शरीराने स्वीकारले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली योग्य उपचारानंतर प्रत्यारोपित केलेल्या गर्भाशयातून मुलीचा जन्म झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button