breaking-newsमनोरंजन

ऐतिहासिक प्रसंगावर भाष्य करणाऱ्या ‘गोल्ड’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता अक्षय कुमार च्या ‘गोल्ड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमार नेहमी सामाजिक संदेश देणारे व देशप्रेम व्यक्त करणारे चित्रपट करत असतो. गोल्ड चित्रपट १९४८ साली लंडनमध्ये झालेल्या १४व्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण पदक मिळाले होते. त्यावर आधारित आहे. १५ ऑगस्टला ‘गोल्ड’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘गोल्ड’ चित्रपट देशातील एका ऐतिहासिक प्रसंगावर भाष्य करतो. ट्रेलर मध्ये दाखवल्याप्रमाणे तपन दासचं हॉकी खेळात भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणे हे स्वप्न असतं. आणि हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी तो कसा एका -एका खेळाडूला एकत्र आणतो. हे या ट्रेलर मध्ये दाखवले आहे.

चित्रपटात अक्षय कुमार ‘तपन दास’ हि भूमिका साकारत आहे. अक्षय कुमारच्या चाहत्यांनी या ट्रेलरला भरपूर प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाची निर्मिती एक्सेल एन्टरटेंमेन्ट करत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार बरोबर मौनी रॉय, अमित साध, सनी कौशल, कुणाल कपूर दिसणार आहेत.

Akshay Kumar

@akshaykumar

Winners under British India, Legends under Free India. Witness the golden era of Indian Hockey through . Out Now : http://bit.ly/Gold_Trailer @excelmovies @FarOutAkhtar @ritesh_sid @kagtireema @Roymouni @kapoorkkunal @TheAmitSadh @ItsVineetSingh @SunnyK0

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button