breaking-newsआंतरराष्टीय

एलिसन आणि होंजो यांना नोबेल पुरस्कार जाहीर

स्टॉकहोम – कॅन्सरमुळे रुग्णाची प्रतिकार शक्ती अत्यंत कमकुवत होते. ती प्रतिकार क्षमता वाढवता येण्यासाठी आपल्या संशोधनातून काम करणारे जेम्स पी एलिसन आणि तासुकू होंजो हे दोघे संयुक्तपणे आरोग्य क्षेत्रातील नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी या दोघांनी एक नवीन थेरपी शोधून काढली आहे ज्यामुळे कॅन्सर असलेल्या रुग्णाची प्रतिकार क्षमता काही प्रमाणात वाढणार आहे.

प्रतिकार करणाऱ्या पेशी कमी होत जातात आणि रुग्ण मृत्यूच्या दाढेत शिरत जातो. यामुळे कॅन्सरशी लढण्यासाठी पुरेशी प्रतिकार शक्ती रोग्याला मिळावी यासाठी अनेक दिवस प्रयत्न सुरू होते. यावर उपाय म्हणून एलिसन आणि होंजो यांनी अशी थेरपी शोधून काढली ज्यामुळे रोग्याची कॅन्सरला प्रतिकार करण्याची शक्ती वाढेल आणि शरीरातील पेशी या कॅन्सरपासून सुरक्षित राहू शकतील. या थेरपीमुळे अनेक कॅन्सरग्रस्तांचे प्राण वाचवता येणार आहेत. आरोग्य क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल या दोघांना नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षीचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेचे तीन संशोधक जेफरी सी हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल यंग यांना संयुक्तरीत्या जाहीर करण्यात आला होता. बायोलॉजिकल क्‍लॉकवर तिन्ही संशोधकांनी अभूतपूर्व काम केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळी ही क्‍लॉक नेमकी कशी काम करते आणि त्यांचे संशोधन नेमके काय होते याची संक्षिप्त माहिती जाहीर करण्यात आली होती.

70 वर्षांत पहिल्यांदाच साहित्याचा नोबेल पुरस्कार देण्यात येणार नाही. त्यामुळे आता शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला दिला जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. शांततेचे नोबेल ओस्लो येथे शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ भौतिकविज्ञान, समाजसेवा, साहित्य, शांतता आणि इतर क्षेत्रांमध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्‍तींना हे पुरस्कार दिले जातात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button