breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

एम्पायर इस्टेट पुलाच्या उद्घाटनपुर्वीच आंदोलन गुंडाळले

पिंपरी – चिंचवडमधील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाला दोन रॅम्प एम्पायर इस्टेट सोसायटीजवळ उतरविले जाणार आहेत. या रॅम्पच्या विरोधात उड्डाणपुलाच्या उद्घाटना प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या आगमनापूर्वी येथील भाजपचे नगरसेवक शैलेश मोरेसह रहिवाश्यांनी निदर्शने केली. परंतु, पालिका पदाधिका-यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन थांबविण्यात आले. दरम्यान, पालकमंत्री बापट यांनीही रहिवाश्यांचे निवेदन स्वीकारले.

महापालिकेच्या वतीने काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या बीआरटीएस मार्गावर चिंचवडमधील एम्पायर इस्टेट येथे उड्डाणपूल उभारण्यात आला. उड्डाणपुलावरून वाहनांना उतरण्यासाठी व चढण्यासाठी दोन रॅम्प बांधण्यात येणार आहेत. एम्पायर इस्टेट सोसायटीत दोन्ही बाजुंनी दोन रॅम्प येणार असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होईल. या भीतीमुळे या रॅम्पला येथील रहिवाश्यांचा विरोध आहे. उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी येथील स्थानिक नगरसेवक शैलेश मोरे यांच्यासह रहिवाश्यांनी आंदोलन सुरू केले होते. हा रॅम्प रद्द करण्याची मागणी विरोधाचे फलक दाखवून ते करत होते.

दरम्यान, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासमोर हे निदर्शने केली जाणार होती. परंतु, उद्घाटनाची नियोजित वेळ साडेपाचची असताना पालकमंत्री बापट यांनी विलंब केला. ते दोन तास उशिरा आले. त्याआधीच भाजपचे स्थानिक नेते खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी नगरसेवक शैलेश मोरे यांच्यासह रहिवाश्यांची भेट घेतली. त्यांना या रॅम्पच्या संदर्भात लवकरच महापालिकेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे रहिवाश्यांनी निदर्शने थांबविले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button