breaking-newsपुणेमहाराष्ट्रमुंबई

एक्स्प्रेस वे वर कंटेनर उलटल्याने अपघात

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर एक कंटेनर उलटला, संध्याकाळी ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. मात्र यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. ही वाहतूक जुन्या मुंबई पुणे मार्गावर वळवण्यात आली आहे. मुंबईकडे जाताना उतार आणि वळण असा रस्ता असल्याने चालकाचा कंटेनरवरचा ताबा सुटला. या अपघातात चालक वाचला असून तो सुखरुप आहे. या मार्गावर हल्ली अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हा कंटनेर हटवण्याचे काम आता सुरु आहे. वाहतूक पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने या ठिकाणी दाखल झाले आहेत. आता लवकरात लवकर हा कंटेनर हटवून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कंटेनर चालकाला किरकोळ जखमा झाल्या आहेत मात्र त्याचा जीव वाचला आहे, अशीही माहिती मिळते आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button