breaking-newsमुंबई

एक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम

  • लैंगिक अत्याचारानंतर हत्या झाल्याचा संशय

मुंबई – सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शीची तोकडी मदत यामुळे गुजरातहून मुंबईत आलेल्या प्रवासी महिलेच्या भूज-दादर एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या हत्येचे गूढ सहा दिवसांनंतरही कायम आहे. बोरिवली-दादर स्थानकांदरम्यान सिग्नलला एक्स्प्रेस थांबली तेव्हा आरोपी डब्यात चढला असावा, असा संशय पोलीस वर्तवत आहेत.

चाळीस वर्षांची ही महिला मुंबईतील आजारी नातेवाईकाला पाहण्यासाठी ७ डिसेंबरला भूज-दादर सुपरफास्ट एक्स्प्रेसने सुरतहून मुंबईत आली. एक्स्प्रेस दुपारी १२च्या सुमारास दादर स्थानकात आली तेव्हा महिलांसाठी आरक्षित सर्वसाधारण डब्यात तिचा मृतदेह नग्नावस्थेत आढळला. धारदार हत्याराने गळ्यावर वार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्याशिवाय शरीरावर अनेक ठिकाणी जखमा व ओरखडे आढळून आले. तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी गायब आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार घडल्याचा संशय आहे. मात्र वैद्यकीय चाचण्यांमधून तसे स्पष्ट झालेले नाही.

रेल्वे पोलिसांची चार पथके या हत्या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यापैकी एक पथक सुरत येथे तपासासाठी रवाना झाले असून अन्य पथके मृत महिलेचा प्रवास, घडलेली प्रत्येक घटना- घडामोडीबाबत माहिती मिळवत आहेत.

पोलिसांनी सुरत ते दादरदरम्यान एक्स्प्रेस ज्या ज्या स्थानकांवर थांबली तेथील सीसीटीव्ही चित्रण तपासले. मात्र, त्यात संशयास्पद काहीही आढळले नाही. बोरिवली ते दादर या प्रवासात ही महिला डब्यात एकटीच होती. या प्रवासात सिग्नलमुळे एक्स्प्रेसला थांबा मिळतो. हीच संधी साधून आरोपी डब्यात चढला असावा, त्याने महिलेला लुटण्याचा प्रयत्न किंवा जबरदस्ती केली, महिलेने प्रतिकार केला असता आरोपीने तिची हत्या केली व पसार झाला, असा पोलिसांचा तर्क आहे. या तर्कानुसार बोरिवली-दादरदरम्यान एक्स्प्रेसला कुठे सिग्नल लागला, तेथे रुळांशेजारी असलेल्या लोकवस्तीत पोलीस चौकशी करीत आहेत.

मृत महिलेवर लैंगिक अत्याचार घडला, हे स्पष्ट करणारा वैद्यकीय अहवाल आलेला नाही. मात्र, या हत्येची उकल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती रेल्वे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button