breaking-newsमनोरंजन

एकता कपूर बनवणार “एक व्हिलन’चा सिक्‍वेल

2011 सालच्या “एक व्हिलन’चा सिक्‍वेल बनवण्याची तयारी एकता कपूरने करायला सुरुवात केली आहे. पहिल्या “एक व्हिलन’मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख होते. एकता करणार असलेल्या “एक व्हिलन’च्या सिक्‍वेलमधील कलाकारही निश्‍चित झाले आहेत. पहिल्या भागात असलेल्या सिद्धार्थ मल्होत्राला एकताने आपल्या सिक्‍वेलमध्येही कायम ठेवले आहे.

पहिल्या भागाचे डायरेक्‍शन मोहित सूरीने केले होते. मात्र आता एकता नवीन दिग्दर्शकाबरोबर काम करणार आहे. मोहित सूरीच दुसऱ्याही भागाचे डायरेक्‍शन करणार आहे आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या बरोबर कृती सेनोन या सिनेमात असणार अशा बातम्या फिल्मी वेबसाईटवरून प्रसिद्ध व्हायला लागल्या होत्या. मात्र सरतेशेवटी त्या अफवाच ठरल्या. एकताने मोहित सूरीलाच या सिनेमाच्या प्रोजेक्‍टमधून बाजूला ठेवले आहे.

सध्या या सिक्‍वेलच्या स्क्रीप्टचे काम सुरू आहे. त्यासाठी एकताने काही लेखकांना कामाला लावले आहे. या स्क्रीप्टला खास एकता टच असणार आहे, हे तर उघडच आहे. ही स्क्रीप्ट फायनल झाल्या नंतर एकता या सिक्‍वेलसाठी आपली कलाकारांची फौज निश्‍चित करेल. या सिक्‍वेलचे नाव सध्यातरी “एक व्हिलन 2′ असे ठरवले आहे. पण कदाचित एकताचा स्वभाव पाहता त्याचे हे नाव बदललेही जाऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button