breaking-newsमनोरंजन

“एआयबी’ प्रकरणी दिपवीरला हायकोर्टाचा तूर्त दिलासा

मुंबई – जाहीर कार्यक्रमात महिलांविषयी बीभत्स वक्‍तव्य केल्याने वादाच्या भावऱ्यात अडकलेल्या बॉलिवूडच्या नवविवाहित दाम्पत्य दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांना मुंबई उच्च न्यायालयाने तुर्त दिलासा दिला आहे. या प्रकरणी दाखल झालेल्या अन्य याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याचे न्यायालयाने निश्‍चत केले आहे. रणदीप आणि दीपिका यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला यापूर्वी दिलेली स्थगिती न्यायालयाने कायम कायम ठेवली आहे.

डिसेंबर 2014 मध्ये मुंबईच्या नॅशनल स्पोटर्स क्‍लब ऑफ इंडिया इथे आयोजित “एआयबी रोस्ट’ या कार्यक्रमात महिलांच्या बाबतीत अत्यंत बीभत्स आणि कमरेखालचे विनोद करण्यात आले होते. या प्रकरणी रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरसह करण जोहर, दीपिका पादुकोण, आलिया भट यांच्यासह कार्यक्रमाच्या आयोजकांचाही समावेश आहे.

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंग यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर गिरगांव न्यायालयात संतोष दौंडकर यांनी तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने या तक्रारीची दखल घेऊन संबंधितांविरोधात गुन्हा नोदविण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी रणवीर सिंग, अर्जुन कपूरसह आणि इतरांनी हायकोर्टात वेगळी याचिकाही दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.

यावेळी या प्रकरणी न्यायालयात अन्य याचिकादाखल करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निर्दशनास आणून देण्यात आले. त्यासर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली. याची दखल घेऊन न्यायालयाने याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button