breaking-newsमनोरंजन

ऋषी कपूर’ आणि ‘अनुपम खेर’ यांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल

बाॅलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर हे प्रकृती ठिक नसल्यामुळे अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीतू सिंग कपूर ही देखील आहे. स्वत: ऋषी कपूर यांनी मागील महिन्यात 29 सप्टेंबर रोजी ट्विटरवरून त्यांच्या आजाराबाबत माहिती दिली होती. तसेच त्यावरील उपचारासाठी मी अमेरिकेला जात आहे असे सांगितले होते.

त्यानंतर काही दिवसापूर्वी ऋषी कपूर हे कॅन्सरने ग्रस्त असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांच्या कुंटूबियांनी पुढे येत ऋषी कपूर हे तब्येत ठिक नसल्यामुळे अमेरिकेतील न्युयाॅर्कमध्ये उपचार घेत असल्याची माहिती दिली होती. ऋषी कपूर अमेरिकेत गेल्यापासून अनेक दिग्गज कलाकार त्याची भेट घेत आहेत.

नुकतीच बाॅलीवूडमधील प्रसिध्द अभिनेते अनुपम खेर यांनी अमेरिकेत जाऊन ऋषी कपूर यांची भेट घेतली. त्यानंतर ऋषी कपूर यांनी एक व्हिडीअो ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीअोमध्ये दोघेही जण न्युयाॅर्कच्या रस्त्यावर फेरफटका मारताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडीअो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Rishi Kapoor

@chintskap

New York,Manhattan. “Kher-free” or is it “Care-free”on Madison Avenue with colleague and old friend Anupam Kher this afternoon!

कपूर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मी माझ्या जुन्या मित्रासोबत तणावमुक्त आयुष्य जगत आहे. दरम्यान अनुपम खेर हे एका मालिकेच्या चित्रीकरणासाठी न्युयाॅर्कमध्ये वास्तव्यास आहेत. त्यावेळी त्यांनी ऋषी कपूर यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत वेळ घालवला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button