breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

उसाची एफआरपी आणि दूध दरवाढ या मागण्यांसाठी पुण्यात ‘कैफियत मोर्चा’

पुणे –  उसाची एफआरपी मिळावी आणि दुधाच्या खरेदी दरात वाढ करावी, या मागण्यासाठी आज (शुक्रवारी) राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या साखर संकुलावर ‘कैफियत मोर्चा’ काढण्यात येत आहे. राजू शेट्टी यांच्या भाषणानंतर नुकतीच या मोर्चाला सुरुवात झाली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले आहेत.

यावेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले ” शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठीची भूमिका स्वाभिमानी संघटनेची आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांसाठी संघर्ष करण्याची वेळ आली त्यावेळी आम्ही सत्तेत आहोत की विरोधात याचा विचार न करता आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिलो आहोत. सध्या दूध विक्रेते तोट्यामध्ये व्यवसाय करीत असून गुजरात सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादक व्यावसायिकांना 450 ते 500 कोटी रुपये द्यावेत तसेच प्रति लिटर पाच रुपये दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करावेत”अशी मागणी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button