breaking-newsमुंबई

उल्हासनगरच्या महापौरपदी भाजपच्या पंचम कलानी

उल्हासनगर – उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या पंचम कलानी यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे तब्बल एक तपानंतर उल्हासनगर शहरावर कलानी परिवाराचे वर्चस्व स्थापन झाले आहे.

पंचम कलानी या माजी आमदार पप्पू कलानी आणि विद्यमान आमदार ज्योती कलानी यांच्या सूनबाई आहेत. भाजपकडून त्यांना उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. तर विरोधी पक्षात असलेल्या शिवसेनेने साई पक्षाच्या फुटीर उमेदवार ज्योती बठिजा यांना समर्थन दिले होते. त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.

ऐनवेळी ज्योती बठीजा यांनी उमेदवारी मागे घेतल्याने पंचम कलानी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे एक तपानंतर उल्हासनगर महापालिकेवर कलानी परिवाराचे वर्चस्व स्थापन झाले आहे.

सर्व पक्षांना सोबत घेऊन उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे या निवडीनंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि महापौर पंचम कलानी यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button