breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उलेमा, मुस्लीम समाजाच्या नाराजीचा एमआयएमला फटका; शहर कार्यकारिणी केली बरखास्त

  • पक्षश्रेष्ठींकडे पाठविले सर्वांचे राजीनामे

पिंपरी – मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेत ताकदीने उतरलेल्या खासदार असददुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने जोरदार मुसंडी मारली होती. मात्र, निवडणुकीतील पराभवानंतर कार्यकर्त्यांनी पक्षाला आतुन पोखरले आहे. आमदार वारिस पठाण यांच्या चुकीच्या हस्तक्षेपामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचा ठपका ठेवून पिंपरी-चिंचवड एमआयएमच्या पदाधिका-यांनी पक्षाकडे राजीनामे दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत एमआयएमने पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी घोषीत करून पदाधिका-यांच्या नेमणुका केल्या. शहराध्यक्ष अकील मुजावर यांच्यावर पक्षसंघटन वाढविण्याची जबाबदारी सोपविली. त्यांच्या नियंत्रणाखाली महापालिका निवडणुकीत पक्षाने 14 उमेदवार दिले होते. निवडणुकीत पक्षाचा प्रचार करण्यासाठी 14 फेब्रुवारी 2017 रोजी पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार असददुद्दीने ओवैसी यांची जाहीर सभा ठेवली होती. मात्र, महाराष्ट्र कोअर कमिटीच्या अयोग्य नियोजनामुळे ही सभा होऊ शकली नाही. त्यामुळे पक्षाचा प्रचार होऊ न शकल्याने पालिका निवडणुकीत सपाटून मार खावावा लागला, अशी कबुली शहराध्यक्ष मुजावर यांनी दिली आहे.

काही कालावधीपूर्वी देहूरोड येथे शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांच्या वडिलांच्या वादग्रस्त दर्ग्याच्या व देहूरोड मुस्लिम जमात दफन भूमी येथे पक्षाचे आमदार  वारीस  पठाण  यांच्या  हस्तक्षेपामुळे  १७  निष्पाप  युवकांवर  गुन्हे दा खल  झाले.  यामुळे  शहरातील उलेमा आणि मुस्लिम समाजसेवक व मुस्लिम संघटनांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, यापुढे पक्षाला सहकार्य करणार नसल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे पक्षाचे भवितव्य अंधारात सापडले आहे. त्यामुळे शहर कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याचे मुजावर यांनी इमेलद्वारे कळविले आहे. पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांच्याकडे सर्वांचे राजीनामे पाठविले आहेत, अशी माहिती पक्षाचे शहर प्रवक्ते धम्मराज साळवे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button