breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

उलटी आल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्यांचा दुहेरी हत्याकांड ; जांभे-नेऱ्हे रस्त्यावरील घटना

पिंपरी – उलटी आल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मोटारीत दोघांनी शिरकाव करत महिलेचा गळा आवळून तर लहान बाळाचे तोंड दाबून खुन केला. तसेच एक लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी (ता. ९) रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान जांभे-नेऱ्हे रस्त्यादरम्यान घडली. आश्विनी दत्ता भोंडवे ( वय २५) व अनुज दत्ता भोंडवे (वय ८ महिने) असे मृतांची नावे आहेत. याबाबत दत्ता वसंत भोंडवे ( वय ३०, रा. दारूब्रे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्ता हे मोटारीतून आपली पत्नी व मुलासह डांगे चौक येथून आपल्या गावी जात होते. त्यावेळी दत्ता यांना उलटी आल्याने बंगळूर-मुंबई महामार्गावर कोयते वस्तीला जोणाऱ्या रस्त्याच्या कडेला त्यांनी मोटार थांबवली. त्यावेळी दोन अज्ञात व्यक्तींनी मोटारीतील मागील सीटवर बसून अश्विनी यांचा ओढणीने गळा आवळला व गाडी जांभे गावच्या पुढे नेण्यास सांगितली. दरम्यान, दोन मोबाईल, सोनसाखळी, मंगळसुत्र व ५० हजारांची रोकड असा एक लाख तीस हजारांचा ऐवज आरोपींनी घेत अश्विनी यांचा ओढणीने गळा आवळून व बाळाचा रूमालाने तोंड दाबून खुन केला. मोटारी जांभे गावच्या पुढे नेऱ्हे गावाजवळ आल्यानंतर आरोपी मोटारी उतरून पळून गेले. असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button