breaking-newsपुणेमहाराष्ट्र
उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू आज पुण्यात
पुणे – उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू हे गुरूवारी पुण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेच्या विस्तारित वास्तूच्या उद्घाटनासह अन्य कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.
गुरूवारी सकाळी 9.50 वाजता त्यांचे पुणे लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को. ऑप. संस्थेतील परिषदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनाला ते उपस्थित राहतील. राजभवनात मुक्काम करून, दुसऱ्या दिवशी ते बारामती येथे जाणार आहेत. तेथील विविध ठिकाणांना ते भेटी देणार असून, त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को. ऑप. येथील परिषदेच्या समारोपाला ते उपस्थित राहणार आहेत.