breaking-newsराष्ट्रिय

उन्नाव बलात्कार प्रकरण; सर्व खटल्यांची सुनावणी होणार दिल्लीत

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेने लिहिलेल्या पत्राची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणाची सुनावणी सुरु झाल्यानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी साॅलिसिटर जनरल तुषार मेहता यांना बलात्कार आणि अपघाताच्या तपासाची माहिती दुपारपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
उन्नाव बलात्कार पीडितेने आरोपींकडून येत असलेल्या धमक्यांची माहिती सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्राद्वारे दिली होती. हे पत्र उशिराने दिल्याने सरन्यायाधीशांनी निराशा व्यक्त केली होती, त्यानंतर गुरूवारी सरन्यायाधीश गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. सरन्यायाधीशांनी सुरूवातीलाच सीबीआय संचालकांशी चर्चा करून बलात्कार आणि अपघाताच्या तपासाच्या सद्यस्थितीबद्दल माहिती सादर करण्याचे निर्देश साॅलिसिटर जनरल तुषार मेहता यांना दिले. तसेच या घटनेशी संबंधित सर्व प्रकरणांची सुनावणी दिल्लीत हलवली आहेत.

न्यायालयात बोलताना मेहता म्हणाले, आपण सीबीआय संचालकांशी बोललो आहे. बलात्कार आणि अपघाताची चौकशी करणारा अधिकारी सध्या लखनऊमध्ये असून दुपारपर्यंत न्यायालयात हजर होऊ शकत नाही. त्यामुळे याप्रकरणाची सुनावणी उद्या घ्यावी, अशी विनंती त्यांनी सरन्यायाधीशांना केली.
त्यावर सुनावणी थांबविली जाणार नाही. सीबीआय संचालकांना तपास अधिकाऱ्याकडून फोनवर माहिती घेण्यास सांगा आणि दुपारी १२ वाजेपर्यंत सविस्तर माहिती न्यायालयासमोर ठेवा, असे सरन्यायाधीशांनी मेहता सांगितले.
दरम्यान, बलात्कार आणि पीडितेच्या गाडीला झालेल्या प्रकरणाची यापुढील सुनावणी लखनऊ नाही, तर दिल्लीत होईल, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button