breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

उदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप

मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाबाहेर हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ माजली आहे. आपल्यावर झालेल्या हल्ल्यासंबंधी सांगताना गुणरत्न सदावर्ते यांनी झालेला हल्ला माझ्यावर नाही तर न्यायव्यवस्था आणि लोकशाहीवरील आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. धमक्यांचे आपल्याला शेकडो फोन आले असून उदयनराजेंच्या नावानेही धमक्या देण्यात आल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं आहे.

उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरु होती. यानंतर न्यायालयात काय घडलं यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना एका व्यक्तीने एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला केला. यावेळी तिथे उपस्थित इतर वकिलांनी त्या व्यक्तीला अडवत त्याला चांगलाच चोप दिला.

आपल्याला धमक्यांचे फोन आल्याचं पोलिसांनाही माहिती आहे. आज सकाळीही पोलिसांना कळवण्यात आलं होतं. थोडी लवकर कारवाई केली असती तर हल्ला टाळता आला असता असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. आपल्यावर झालेल्या हल्ल्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून चिंता व्यक्त केली आहे. तसंच सुरक्षा देण्याचा आदेश देण्यात आला आहे अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.

उदयनराजेंच्या नावाने धमकीचे फोन येत असल्याचा आरोप करताना पोलीस तक्रारीत उदयनराजेंचं नाव देण्यात आलं आहे. कारण ते मराठा समाजाचं नेतृत्व करत आहेत अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास असून मी घाबरत नाही. मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं असं म्हटलं. तसंच कोणतीही भीती न बाळगता पुढचा लढा लढत राहीन असा निश्चय त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button