breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

उत्तर भारतात 6.2 रिक्‍टर स्केलचा भूकंप

नवी दिल्ली – दिल्ली-एनसीआरमध्ये आज 6.2 रिक्‍टर स्केलचा भूकंपाचे हलके झटके जाणविले. हे धक्‍के दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्‍मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातील राज्यात जाणविले. तसेच उत्तर भारतासह शेजारील राष्ट्र पाकिस्तान आइण अफगाणिस्तानमध्येही याचा प्रभाव होता.

अफगाणिस्तान आइण ताजिकिस्तान यांच्या सीमाभागात या भूकंपाचा केंद्र बिंदू दर्शविण्यात आला आहे. रिक्‍टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.2 अशी नोंदविण्यात आली आहे. जम्मू-काश्‍मीरमध्येही भूकंपाचे झटके बसले. सध्या या भूकंपामध्ये कोणत्याही प्रकारे जीवीत किंवा मालमत्ताचे नुकसान झाले नसल्याचे समजते.

दरम्यान, गतवर्षी 2 जून रोजी दिल्लीत भूकंपाचे मोठे धक्‍के बसले होते. त्यावेळी रिक्‍टर स्केलवर त्याची तीव्रता 5 अशी नोंदविण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्यावेळी भूकंपाचा केंद्र बिंदू हरियाणातील रोहतक येथे होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button