breaking-newsआंतरराष्टीय

उत्तर कोरिया अद्यापही धोकादायकच !

अमेरिकेच्या अध्यक्षांचे प्रतिपादन 
वॉशिंग्टन – उत्तर कोरियाच्या अध्यक्षांशी माझी चर्चा झाली असली तरी अजून त्या देशापासून अण्वस्त्रांचा धोका कमी झालेला नाही असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. 13 जूनला त्यांनी उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आता उत्तर कोरियापासून कोणताही अण्विक धोका नाही, आता शांत झोपा असा ट्‌विटर संदेश स्वत: ट्रम्प यांनी आपल्या अकौंटवर पोस्ट केला होता. पण त्याच ट्रम्प यांनी आज हा धोका अजून कायमचा संपलेला नाही असे म्हटले आहे. त्यामुळे आमचे त्या देशावरचे निर्बंध कायम राहतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की त्या देशातून अण्विक सामग्री निर्यातीचा धोका कमी झालेला नसल्याने जगाला आणि अमेरिकेला त्यांच्यापासून कायम सावधच राहावे लागणार आहे.

कोरियाच्या बाबतीत आम्ही अजून एक वर्षासाठी तरी राष्ट्रीय आणिबाणी जारीच ठेवणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात झालेला निशस्त्रीकरणाचा करार मोघम स्वरूपाचा आहे त्यातून फारसे काही साध्य होणार नाही असे आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी त्याचवेळी म्हटले होते त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button