breaking-newsआंतरराष्टीय

उत्तर कोरिया अण्वस्त्रमुक्त नावाखाली अण्वस्त्रधारी देश राहणार – थाई यॉंग हो

वॉशिंग्टन (अमेरिका) – उत्तर कोरिया अण्वस्त्रमुक्त नावाखाली अण्वस्त्रधारी देश राहणार असल्याचे वक्तव्य थाई यॉंग हो यांनी केले आहे. थाई यॉंग हो हे उत्तर कोरियाचे अमेरिकेतील माजी उप राजदूत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांची शिखर परिषद पुढील महिन्यात सिंगापूरमध्ये होत आहे. सारे काही आलबेल होत असल्याचे वाटत असतानाच उत्तर कोरियाचे अमेरिकेतील माजी उप राजदूत थाई यॉंग हो यांनी एक राजकीय बॉंबगोळा टाकला आहे.

उत्तर कोरिया हा कधीही अण्वस्त्रमुक्त देश होणार नाही, सध्या चालू असलेल्या राजकीय हालचाली आणि डावपेच यामुळे संपूर्ण निरस्त्रीकरण होऊ शकणार नाही. केवळ अण्वस्त्र धोक्‍याचे प्रमाण कमी होणार आहे. कोरिया हा अण्वस्त्रधारी देश राहणारच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यात 12 जून रोजी होणाऱ्या शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर थाई यॉंग हो यांच्या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.

ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्या मुलाखतीत उत्तर कोरियाच्या आण्विक कार्यक्रम हाच सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. प्रथम प्रचंड तणाव निर्माण करायचा आणि मग अचानक शांतीचे संकेत द्यायचे ही उत्तर कोरियाची रणनीती आहे. त्यानुसारच उत्तर कोरियाने आपली आण्विक चाचणी केंद्र बंद करण्याचे जाहीर केले आहे.

ऑगस्ट 2016 मध्ये उप राजदूत पद सोडलेल्या थाई यॉंग हो यांनी दक्षिण कोरियन वृत्तसंस्था न्यूसिस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत वरील वक्तव्य केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button