breaking-newsपुणेमहाराष्ट्र

“उजनी’वर 1 हजार मेगावॅटचा तरंगता सौर उर्जा प्रकल्प

समितीचे कार्य
* तरंगता सौर उर्जा प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे.
* पर्यावरण विभागाकडून व सामाजिक घटकाकडून आवश्‍यक त्या परवानगी मिळविणे
* पाण्याच्या पातळीत होणारा बदल याचा महिनानिहाय आलेख तयार करणे
* प्रकल्पासाठी आवश्‍यक ती व्यवस्था उपलब्ध करून देणे
* प्रकल्पासाठी कामकाज, कार्यपद्धती, अंमलबजावणी आदी बाबी निश्‍चिती करणे व आवश्‍यक ती कार्यवाही करणे.

  • अभ्यास करण्यासाठी शासनाने नेमली समिती, सर्वंकष प्रकल्प अहवाल तयार करणार

पुणे – उजनी धरणाच्या जलाशयावर 1 हजार मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर उर्जा प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. तरंगता सौर उर्जा प्रकल्प स्थापन करण्यासाठी आवश्‍यक असणारी कार्यपद्धती, अंमलबजावणी निश्‍चित करण्यासाठी शासनाने सहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीने या प्रकल्पाचा अभ्यास करून दोन महिन्यांत सर्वंकष प्रकल्प आराखडा सादर करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

नवीन व अपारंपारिक (नवीकरणीय) उर्जा स्रोतांपासून वीज निर्मितीचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन केंद्र शासनाने अशा उर्जा स्रोतांद्वारे देशात 2022 पर्यंत 175 गिगावॅट एवढा वीजनिर्मितीचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. यामध्ये 100 गिगावॅट सौर उर्जा निर्मितीचा समावेश आहे. त्यादृष्टीने देशभरात व राज्यांमध्ये नवीन व नवीकरणीय उर्जा स्रोतांपासून वीजनिर्मितीचे कार्यक्रम हाती घेण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे.

राज्यातील उर्जेची वाढती मागणी लक्षात घेता, नवीन व अपारंपारिक उर्जा स्रोतांचा विकास करणे अपरिहार्य आहे. जमिनीवरील उपलब्ध नैसर्गिक स्रोतांच्या वापरावर काही प्रमाणात मर्यादा येत असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या नदी, समुद्र आणि धरणे यांच्या पृष्ठभागाचा उपयोग करून तरंगते सौर उर्जा प्रकल्प राज्यात राबविण्यास मोठ्या प्रमाणात बाब आहे. ही बाब विचारात घेऊन शासनाने उजनी धरण (जि.सोलापूर) येथे जलाशयावर एक हजार मेगावॅट इतक्‍या क्षमतेचा तरंगता सौर उर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महावितरण कंपनीस अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्त केले आहे.

महावितरण कंपनीने या प्रकल्पासाठी ज्या कंपन्या हे काम करण्यास तयार असतील, त्यांच्याकडून सूचना मागविल्या होत्या. त्यास अनुसरून काही स्वारस्य धारकांकडून काही सूचना प्राप्त झाल्या आहेत. या सर्व सूचनांचा विचार करून तसेच तरंगता सौर उर्जा प्रकल्पाच्या नवीन तंत्रज्ञानाबाबत या क्षेत्रातील मर्यादित अनुभवाचा विचार करून तरंगता सौर उर्जा प्रकल्प स्थापन करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या बाबींचा अभ्यास करण्यासाठी शासनाने 6 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी महावितरणचे वाणिज्य विभागाचे संचालक सतीश चव्हाण यांची निवड केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button