breaking-newsराष्ट्रिय

ईदनंतर मोहम्मद शमी लग्न करणार – हसीन जहाँ

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँच्या वादग्रस्त प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. आतापर्यंत शमीवर त्याची पत्नीगंभीर आरोप केले होते. त्यात आणखी एक भर पडली आहे. मोहम्मद शमी भावाच्या मेहुणींसोबत ईद झाल्यानंतर लग्न करणार आहे आणि याच कारणामुळे शमी मला घटस्फोट देणार आहे, असा खळबळजनक आरोप हसीन जहाँने  केला आहे.

क्रिक ट्रॅकरने दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद शमी भावाच्या मेव्हणीसोबत लग्न करणार असल्याचा दावा हसीन जहाँने केला आहे. ‘ईदनंतर पाच दिवसांनी शमी बोहल्यावर चढणार आहे, आणि णि त्याचमुळे त्याने मला पैशांची ऑफर देत घटस्फोट देण्याची मागणी केली आहे’, असा खळबळजनक आरोप हसीनने केले आहेत.

हसीनच्या आरोपांवर  प्रतिक्रिया देताना मोहम्मद शमीने मी दुसरे लग्न करण्यासाठी वेडा झालेलो नाही असे म्हटले आहे. पहिल्या लग्नामुळे माझ्या आयुष्य ढवळून निघाले असून मला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तुम्हाला वाटते की मी वेडा झालोय दुसरा लग्न करायला. हसीनने गेल्या काही महिन्यात केलेले आरोप एकाच क्रमातील आहेत, असे शमी आपल्या स्पष्टीकरणात म्हणाला. तसेच मी दुसरे लग्न केल्यास हसीनला नक्की बोलवेल असेही शमी तिला खिजवण्यासाठी म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button