breaking-newsराष्ट्रिय

इस्रोचे “जीसॅट 1′ प्रक्षेपणासाठी तयार

नवी दिल्ली – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात “इस्रो’चा उपग्रह “जीसॅट -11′ प्रक्षेपणासाठी तयार असल्याचे इस्रोने म्हटले आहे. तपासणीसाठी हा उपग्रह फ्रेंच ग्युनियातील कोउरोउ येथे पाठवण्यात आला होता. “इस्रो’ने यावर्षी मार्च महिन्यात श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केलेल्या एका अन्य एका उपग्रहाबरोबरचा संपर्क तुटल्याने “जीसॅट-11’ला प्रक्षेपणातून थांबवण्यात आले होते.

“जीसॅट- 11′ या उपग्रहाचे वजन 5,700 किलो असून यावर्षी कोउरोउ येथून तो प्रक्षेपित केला जाणार होता. भारताचे अवजड उपग्रह दक्षिण अमेरिकेतील कोउरोउ येथूनच प्रक्षेपित केले जात असतात. मार्च महिन्यात प्रक्षेपित केलेल्या “जीसॅट-6ए’ चा उपयोग लष्करी संवादासाठी केला जाणार होता. मात्र हा उपग्रह संपर्क कक्षेपासून दूर गेल्याने “इस्रो’ला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे “जीसॅट-11’ची सविस्तर तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या चाचण्यांनंतर “जीसॅट-11′ प्रक्षेपणासाठी योग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे “इस्रो’च्या सूत्रांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button