breaking-newsआंतरराष्टीय

इस्त्रायलमधील अमेरिकेच्या दुतावासाचे जेरुसलेमला स्थलांतर

तेल अवीव : वारंवार  होणाऱ्या विरोधानंतर अमेरिकेने इस्त्रायलमधील आपले दुतावास तेल अवीवहून जेरुसलेमला स्थलांतरीत करण्यास सुरुवात केली आहे. जेरुसलेममध्ये या स्थलांतर कार्यक्रमासाठी उद्घाटन समारंभाचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर उपस्थित होते.

दरम्यान, पॅलेस्टाइनच्या गाजा सीमेवर मोठ्या तणावाच्या परिस्थिती दरम्यान अल कायदाचा प्रमुख अल-जवाहिरीने अमेरिकेच्या इस्त्रायलमधील दुतावासाला जेरुसलेमला स्थलांतरित करण्यावरुन मुस्लिमांना अमेरिकेविरोधात जिहाद पुकारण्याचे आवाहन केले आहे. यावेळी जवाहिरीने पॅलेस्टाइनच्या चर्चेच्या नितीही अपयशी ठरल्याचे सांगितले. आपल्या दुतावासाच्या उद्घाटन समारंभाला स्वतः ट्रम्प हजर राहिले नाहीत. मात्र, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील अन्य देशांना त्यांचे दुतावास तेल अवीवहून जेरुसलेम येथे स्थलांतरीत करण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाची मध्य-पूर्व मुस्लिम देशांसह इतरही अनेक देशांनी विरोध दर्शवला आहे. कारण, १९६७च्या युद्धात इस्त्रायलवर जेरुसलेम पॅलेस्टाइनकडून जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेतला आणि त्यावर अधिपत्य गाजवले. मात्र, इस्त्रायलने जेरुसलेमला कायमच आपली अविभाजीत राजधानी मानले आहे.

दरम्यान, अल कायदाचा प्रमुख अल-जवाहिरी याने पाच मिनिटांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून पॅलेस्टिनी सरकारला देश विकणारे सरकार अशी संभावणा केली असून आपल्या समर्थकांना हातात हत्यारे घेण्याचे आवाहन केले आहे. आपल्या व्हिडिओमध्ये त्याने तेल अवीवलाही मुस्लिमांची भूमी असे संबोधले आहे. त्याने ट्रम्प यांच्यावर आधुनिक धर्मयुद्धाला सुरुवात केल्याचा आरोप केला आहे. जवाहिरीने म्हटले आहे की, मुस्लिम देश मुस्लिमांच्या हिताचे काम करु शकलेले नाहीत. कारण शरियत ऐवजी त्यांनी अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांचा हात धरला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button