breaking-newsमनोरंजन

इशा अंबानीच्या लग्नासाठी नववधूप्रमाणे सजलं ‘अँटीलिया’

रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुलीचा विवाहसोहळा आज मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अंबानी यांचं राहतं घर ‘अँटीलिया’ एखाद्या नववधुप्रमाणे सजवण्यात आलं आहे.

इशा अंबानी ही आनंद पिरामलसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. हा सोहळा अंबानींच्या २७ मजली अँटीलिया या आलिशान इमारतीमध्ये पार पडणार आहे. त्यासाठी अँटीलिया इमारत एखाद्या नववधूप्रमाणे सजवण्यात आली आहे. इमारतीला रंगीबेरंगी रोषणाई करण्यात आली आहे. पण त्याबरोबर इमारतीच्या मुख्यद्वारावर विविधप्रकारच्या फुलांचीही सजावट करण्यात आली आहे. मुख्यद्वारापाशी बांधण्यात आलेल्या लाल फुलांची कमान सर्वाचं लक्ष वेधून घेत आहे.

अँटीलिया हे आत्ताच्या घडीला मुंबईतील सर्वात महागडं आणि आलिशान घर असून २७ मजल्यांच्या घरात ६ मजले हे पार्किंगसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. नुकतंच इशा अंबानीचं प्री वेडिंग सेलिब्रेशन उदयपूरमध्ये पार पडलं. या सोहळ्यासाठी संपूर्ण बॉलिवूड उपस्थित होतं. पण त्याचबरोबर हिलेरी क्लिंटन, बियॉन्से यांनीही उपस्थिती लावली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button