breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

इराणवर आत्तापर्यंतचे सर्वात कडक निर्बंध लागू करणार…

  • अमेरिकेचा इशारा 

वॉशिंग्टन – इराणवर आत्तापर्यंत इतिहासात कधीच घालण्यात आले नाहीत इतके कडक निर्बंध आम्ही घालू असा इशारा अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांनी दिला आहे. इराणने अणु करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने अमेरिकेने हा इशारा दिला असून अमेरिकेने युरोपियन समुदायातील देशांनाही इराणशी जपूनच व्यवहार करावा अशी सूचना केली आहे. इराण हा केवळ अण्वस्त्रधारी देश नसून जगातील दहशतवादाला प्रोत्साहन देणारा एक मोठा देश आहे असे त्यांनी म्हटले आहे. सीआयएशी झालेल्या बैठकीच्यावेळी विदेश मंत्र्यांनी हा इशारा दिला आहे.

आमचा इशारा गांभीर्याने घ्या अशी इराणला सूचना करताना पॉम्पेओ यांनी म्हटले आहे की आम्ही त्या देशावर अभुतपुर्व आर्थिक दबाव आणणार आहोत. इराणने अणु करारातून बाहेर पडण्याचे जे पाऊल उचलले आहे ते घातक आहे आणि ते अमेरिका कधीच मान्य करणार नाही. त्यांनी निवडलेला मार्ग धोकादायक आहे असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान इराणनेही अमेरिकेच्या या निर्बंधांना तोंड देण्याची तयारी सुरू केली असून कालच अध्यक्ष रौहानी यांचे एक निवेदन प्रसिद्धीला देण्यात आले आहे त्यात त्यांनी अमेरिकेच्या या इशाऱ्याला आव्हान देताना म्हटले आहे की इराण आणि जगाविषयी निर्णय घेणारे तुम्ही कोण आहात? अ्रमेरिकेन आपल्यावर नियंत्रण ठेवावे असे जगाला वाटत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

जगातल्या प्रत्येक देशाला त्यांच्या मताप्रमाणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यात अमेरिका हस्तक्षेप करू शकत नाहीं असे नमूद करीत त्यांनी अमेरिकेच्या धोरणाला तोंड देण्याची तयारी दर्शवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button