breaking-newsआंतरराष्टीय

इराणवरील हल्ला ट्रंप यांनी केवळ 10 मिनिटं आधी का रोखला?

पेट्रोलिंग करणारं अमेरिकेचं एक ड्रोन पाडल्यावरून इराण आणि अमेरिकेतील तणावात चांगलीच भर पडली असून दोन्ही देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. दोन्ही देशांमध्ये गेल्या काही काळापासून तणाव वाढीस लागला आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेनं ओमानच्या आखातामध्ये त्यांच्या युद्धनौका आणि लढाऊ विमानं तैनात केली होती.

Donald J. Trump

@realDonaldTrump

….Death to America. I terminated deal, which was not even ratified by Congress, and imposed strong sanctions. They are a much weakened nation today than at the beginning of my Presidency, when they were causing major problems throughout the Middle East. Now they are Bust!….

Donald J. Trump

@realDonaldTrump

….On Monday they shot down an unmanned drone flying in International Waters. We were cocked & loaded to retaliate last night on 3 different sights when I asked, how many will die. 150 people, sir, was the answer from a General. 10 minutes before the strike I stopped it, not….

गुरुवारी इराणने अमेरिकेचे एक स्वयंचलित ड्रोन पाडल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप चांगलेच संतापले होते, व त्यांनी ईराणवर हल्ल्याची योजनाही आखली होती. मात्र हल्ल्याच्या केवळ 10 मिनिटे आधी ट्रंप यांनी हा हल्ला रोखला. प्रत्युत्तरादाखल हल्ला करण्यासाठी अमेरिकेने तीन जागांची निवडही करण्यात आली होती. मात्र ट्रंप यांनी आपला निर्णय बदलला. “हल्ला होण्यापूर्वी फक्त 10 मिनिटे आधी मी तो रद्द केला.”अशी माहिती स्वतः ट्रंप यांनी ट्विटरद्वारे दिली.

या हल्ल्यात ईराणचे किती लोक मरतील, असं सैन्याला विचारलं आणि किमान दीडशे लोक मरतील, असं सैन्याकडून सांगण्यात आलं. त्यामुळे मानवरहित ड्रोन पाडल्याच्या बदल्यात दीडशे लोकांचा जीव घेणं योग्य नाही, असं सांगत हल्ल्याचा निर्णय कारवाईच्या 10 मिनिटे अगोदर रद्द केला अशी माहिती ट्रंप यांनी ट्विटरद्वारे दिली. याशिवाय न्यूयॉर्क टाइम्सने रात्री उशिरा प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये, इराणवर हल्ल्याची कारवाई अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच ट्रंप यांनी लष्कराला थांबण्याचा निर्णय दिला असे म्हटले. सैन्य पूर्णपणे तयार आहे, सैन्य नवं आहे आणि प्रत्येक आव्हानासाठी तयार आहे, आपल्याला कोणतीही घाई नाही असं ट्रंप यांनी विधान केलं आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीत आपल्या तेलवाहू जहाजावर इराणने हल्ला केल्याचा आरोप अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच केला होता. यमनमधील हुती बंडखोरांना ईराणने पाठिंबा देणं अमेरिकेला पटलेलं नाही. दुसरं म्हणजे 1979 सालच्या ईराण क्रांतीवेळी 400 दिवस अमेरिकन दुतावासात अमेरिकन लोकांना ओलीस धरण्यात आलं होतं. त्यामुळे अमेरिका आणि ईराण हा वाद जुना आहे. जाणकारांच्या मते, ईराणला नियंत्रणात आणण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची धडपड सुरु आहे. कारण, एकेकाळी ईराणमध्ये सत्तापालट करणाऱ्या अमेरिकेलाच आता ईराणचं आव्हान निर्माण झालंय. आणखी एक कारण म्हणजे इस्रायललाही ईराण पटत नाही आणि इस्रायलचे अमेरिकेशी चांगले संबंध आहेत. इस्रायलचं धोरण अँटी ईराण असल्यामुळे अमेरिकेने ईराणला नियंत्रणात आणावं ही इस्रायलची इच्छा आहेच.

भारताला फटका – अमेरिकेच्या कारवाईनंतर भारतानेही ईराणकडून तेल आयात बंद करण्याचं जाहीर केलंय. पण ईराणसारखा सोपा पर्याय भारत कुठून शोधणार हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. ईराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध झाल्यास भारतासह इतर देशांनाही मोठा फटका बसणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button