breaking-newsआंतरराष्टीय

इराकमध्ये राज्यपालांच्या मुख्यालयावर हल्ला

एर्बिल – इराकी कुर्दीस्तानची राजधानी असलेल्या एर्बिल शहरात तीन किशोरवयीन बंदुकधारी हल्लेखोरांनी राज्यपालांच्या मुख्यालयावर हल्ला केला ज्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यु झाला आहे. या तिन्ही हल्लेखोरांना मारण्यात सुरक्षाबलांना यश मिळाले आहे.

पहाटेच्या वेळी तीन बंदुकधारी युवकांनी अंधाधुंद गोळीबार करत राज्यपालांच्या मुख्यालयात प्रवेश केला ज्यावेळी तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेला एक पोलिस कर्मचारी या गोळीबारा मुळे जखमी झाला. मात्र काही वेळाने या गोळीबारामुळे कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यु झाला. तर सुराक्षादला बरोबर झालेल्या गोळीबारा मध्ये सुरक्षाबलातील अनेक कर्मचारी जखमी झाले.

यावेळी एर्बिलचे राज्यपाल नवझाद हादीयांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगीतले की, याहल्लुयामध्ये एका कर्मचाऱ्याचा मृत्यु झाला आहे तर कुर्दीशचे उप पोलिस प्रमुख फरहाद मोहम्मदयांनी सांगीतले की, यावेळी झालेल्या चकमकीत अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत मात्र त्यांनी जखमींचा आकदा सांगीतला नाही.

यावेळी पुढे बोलताना मोहम्मदयांनी सांगीतले की, चार तास सुरक्षा बल आणि हल्लेखोरांमध्ये चकमक चालू होती त्यानंतर हल्लेखोरांना मारण्यात यश मिळाल्याचे सांगीतले, त्यांनी या हल्ल्यआला दहशतवादी हल्ला असे संबोधीत केले मात्र यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात असावा या बाबत कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही.

कुर्दिस्तानच्या दहशतवादविरोधी पथकाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हल्लेखोरांपैकी दोघांचे वय हे 16 होते तर तिसरा हल्लेखोर हा 18 वर्षांचा होता. यावेळी एकाप्रत्य्क्षदर्शीने सांगीतले की त्याने सकाळच्यावेळी खुप मोथ्या प्रमाणात बंदुकींचा आणि बॉम्ब फुटण्याचा आवाज ऐकला. यावेळी उप-राज्यपाल ताहेर अब्दुल्लाहयांनी सांगीतले की, असायिशया कुर्दीश सुरक्षाबलातील तुकडीने हल्लेखोरांचा शोध घेत त्यांना मारण्यात यश मिळवले.

या दहशतवादी हल्ल्याची आता पर्यंत कोणत्याही संघटनेने जवाबदारी घेतलेली नसुन या हल्ल्या मागील कारणही अद्याप अस्पष्ट आहे. अश्‍याच प्रकारचा हल्ला 2015 साली इस्लामीक स्टेटच्या आतंकवाद्यांनी केला होता. तर गतवर्षी एबिल येथील प्रांतीय परिषदेच्या

कार्यालयासमोर एका सुसाईड बॉम्बरने केलेल्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यु झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button