breaking-newsमनोरंजन

इन्स्टाग्रामवर दीपिका, प्रियांकाला मागे टाकत श्रद्धा ठरली नंबर वन

कमी कालावधीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आगामी ‘स्त्री’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. करिअरच्या बाबतीत सतर्क झालेली श्रद्धा प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करत असून इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री ठरली आहे.

‘स्त्री’ या चित्रपटामुळे चर्चेत राहिलेली ‘आशिकी गर्ल’ श्रध्दा कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियानुसार, इंस्टाग्राम वर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनलेली आहे. विशेष म्हणजे यावेळी श्रद्धाने दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा या अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे.

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. इन्स्टाग्रामवर सर्वश्रेष्ठ ठरलेल्या यादीमध्ये श्रद्धाला १०० गुण मिळाले आहेत. तर आलियाला ८५ गुण मिळाले आहेत. या अभिनेत्रींच्या पाठोपाठ दीपिका पादुकोणने ६८ गुण मिळवत तिस-या स्थानावर बाजी मारली आहे. या व्यतिरिक्त प्रियांका आणि सोनमला अनुक्रमे ६६, ५९ गुण मिळवत चौथ्या आणि पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.

‘केवळ एका महिन्यामध्ये श्रद्धाने सातव्या स्थानावरुन सरळ प्रथम स्थान पटकावलं आहे. त्यामुळे बॉलिवूडमधल्या तिच्या साऱ्याच स्पर्धकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र यशाच हे शिखर गाठणाऱ्या श्रद्धाची वाटचाल नक्कीच उल्लेखनीय आहे असं म्हणायला हरकत नाही, असं स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणाल्या.

दरम्यान, श्रद्धा लवकरच राजकुमार राव सोबत ‘स्त्री’ या चित्रपटात झळकणार असून शाहीद कपूरबरोबर ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटामध्येही ती स्क्रिन शेअर करणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button