breaking-newsआंतरराष्टीय

इटलीतील वादळात 12 ठार; पूराचा हाहाकार

रोम- इटलीतील सिसीली भागात आलेल्या विचित्र वादलामुळे किमान 12 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात अचानक मुसळधार पाऊस आल्याने पूराची स्थिती निर्माण झाली आहे. पालेर्मो भागात नद्यांची पातळी झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे किनाऱ्याजवळील वसाहतींमध्ये पूराचे पाणी घुसले आहे. पूराचा जोर इतका होता की काही नागरिकांना घरांच्या छपरांवर आश्रय घ्यावा लागला आहे.
ऍग्रिगेंटो जवळच्या कामाराटा येथे सारसेनो नदीला आलेल्या पूराच्या पाण्यामध्ये अनेक वाहनेही वाहून गेली आहेत.

या पूरामध्ये वाहून गेलेल्या नागरिकांचा शोध पाणबुड्यांच्या मदतीने घेतला जात आहे. ऍग्रिगेंटो प्रांतात मोंटेवॅगो येथील एका हॉटेलमध्ये अडकलेल्या 14 जणांची बचाव पथकाने सुटका केली. या हॉटेलला बेलिस नदीला आलेल्या पूराने वेढा घातला आहे. पर्यटकांचे आकर्षणस्थळ असलेल्या पूरातन ग्रीक मंदिरांचेही या पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे.
उत्तर इटलीतील अन्य भागातही वादळाचे तडाखे बसले आहेत. अल्पाईन खोऱ्यातील लाखो झाडे उन्मळून नदीच्या पात्रात वाहून गेली आहेत. त्यामुळे गावांमधील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. रस्ते वाहतुकही अनेक ठिकाणी पूर्णपणे बंद झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button