breaking-newsमुंबई

इंद्राणी मुखर्जी पुन्हा रूग्णालयात

मुंबई – शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला अचानक लो ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाल्याने तिला पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला अचानक डोकेदुखी आणि चक्कर येऊ लागल्याने 45 वर्षीय इंद्राणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यावेळी तिला लो ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिला रूग्णालयात हलवण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला.

गेल्या पाच दिवसात तिला रूग्णालयात दाखल करण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या सोमवारीही तिला अस्वस्थ वाटू लागल्याने रूग्णालयात हलवण्यात आले होते पण तेथील सुरूवातीच्या उपचारानंतर तिची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. गेल्या एप्रिल महिन्यात तिला औषधांचा ओव्हरडोस झाल्यामुळेही रूग्णालयात हलवण्यात आले होते. आपल्याच मुलीची हत्या केल्याच्या आरोपावरून ती सन 2015 पासून कारागृहात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button