breaking-newsआंतरराष्टीय
इंडोनेशियात बॉंबच्या अफवेने विमान प्रवाशांची पळापळ ; 10 जखमी
जकार्ता – इंडोनेशियाच्या लायन एअर प्लेनचे विमान 189 प्रवाशांसह उड्डाणासाठी सज्ज असतानाच एका प्रवाशाने विमानात बॉंब असल्याची आरोळी ठोकल्याने विमान प्रवाशांची चांगलीच धावाधाव झाली. या अफवेने विमानाचे इमर्जन्सी दार तोडून प्रवाशांनी खाली उड्या मारल्या. त्यात त्यांच्या डोक्याला तसेच इतरत्र मार लागून किमान दहा प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यातील काही जणांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.
बॉंबची ही अफवा असल्याचे तपासणीनंतर निष्पन्न झाले. ही अफवा पसवणारा फ्रांटीनस निरीगी नावाच्या एका 26 वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर विमानाचे इर्मजन्सी दार तोडणाऱ्या प्रवाशालाही अटक करण्यात आली आहे. या गडबडीत जे दहा जण जखमी झाले आहेत त्यातील आठ जणांची हाडे मोडली आहेत.